खोपोली पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेतील साजगाव आणि देवन्हावे या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतदान पक्रिया आज दिनांक १८ / १२ / २०२२ रोजी पार पाडण्यात येत आहे. सदरची मतदान पंक्रिया ही शांततेच्या व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता आवश्यक त्या ठोस उपाययोजना करण्याबाबत आणि सक्त पेट्रोलिंग करण्याबाबत मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड, मा. श्री अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड आणि मा.श्री.संजय शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग यांनी आदेशीत केले होते, त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे श्री शिरीष पवार, पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये योग्य तो बंदोबस्त नियुक्त केला होता आणि सक्त गस्त देखील सुरू ठेवली होती.
या दरम्यान आज रोजी एक पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ जीप क्रमांक एमएच/०५/ए एक्स / ६२०१ साजगांव व सारसन या भागामध्ये संशईतरित्या फिरत असल्याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून सकाळी ०८:०० वा. चे सुमारास प्राप्त झाली होती. सदर स्कॉर्पिओ जीपमधील वाहनाद्वारे मतदान प्रक्रियेच्या कामकाजा वर प्रभाव पाडण्याची व मतदार प्रक्रिया बाधित करण्याची शक्यता लक्षात घेवून पो. नि. श्री शिरीष पवार यांनी सदरची माहिती अतिशय गांभीयनि घेवून गस्ती पथकास त्वरीत सदरची स्कॉर्पिओ जीप शोधून काढण्याबाबत आदेशित केले व सदर स्कॉर्पिओ जीपची शोध मोहिम सुरू करण्यात आली. त्यानुसार खोपोली पोलीसांना सदरची स्कॉर्पिओ जीप ही ताकई आडोशी रस्त्याला दिसून आल्याने त्यांनी जीपचा पाठलाग सुरू केला. नमूद जीप चालकास त्याचा पाठलाग होत असल्याचे समजल्यानंतर त्याने त्याच्या ताब्यातील नमूद स्कॉर्पिओ जीप हो वेगाने खोपोलीच्या दिशेने पळविण्यास सुरुवात केली. परंतू खोपोली पोलीसांच्या पथकाने नमूद स्कॉर्पिओ जीपचा थरारक पाठलाग करून ती स्कॉर्पिओ जीप मौजे ताकई गाव हददीमध्ये पेण खोपोली रस्त्यालगत असणा-या ए रेहमान ऑटो रिजच्या पाठीमागे जीप चालविणा-या इसमासह पकडली व जीप सह त्या इसमास ताब्यात घेतले. नमूद स्कॉर्पिओ जीपची दोन पंचासमक्ष जागीच झडती घेतली असता त्यामध्ये ७३,१२८/- रुपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटखा पान मसाला व तंबाखूसह एक नकली बंदूक आणि तीन तलवारी अशी अवैध घातक शस्त्रे असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले. त्यामुळे पोलीसांनी त्वरीत सदर स्कॉर्पिओ जीपचा चालक नामे जमील इस्तियाक खान, वय ३० वर्षे राहाल नंबर ०२. ता. खालापूर, जि. रायगड, मुळ रा. ग्राम मदारीपुर, ता. जि. जालौन, थाना कुठौन, उत्तरप्रदेश, पिन नंबर २८५१३० यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द खोपोली पोलीस ठाणे कॉ.गु.र.नं. ३९८ / २०२२, भा.द.वि.सं.कं. ३२८, २७२, २७३, १८८. सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम सन २००६ चे कलम २६ (२), २७, ५९ आणि भारतीय हत्यार कायदा सन १९५९ चे कलम ४, ७, २५, २६ व २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई दरम्यान खोपोली पोलीसांनी नमूद आरोपीताच्या ताब्यातून ६,२६,६२८/- रूपये किंमतीचा मुददेमाल त्यामध्ये आरोपीताने अवैधरित्या जवळ बाळगलेल्या तीन तलवारी, एक नकली बंदूक आणि आरोपीत याने गुन्हा करण्याकरिता वापरलेली महिंद्रा स्कार्पिओ जीप असा जप्त केला आहे.
नमूद कारवाईमध्ये पो. नि. श्री शिरीष पवार, सपोनि. श्री. राकेश कदम, पोहवा / २१३० सागर शेवते, पोना / २२७४ सतिश बांगर, पोकों / ५२८ कादर तांबोळी यांनी सहभाग घेतला असून खोपोली पोलीसांच्या या थरारक व धाडसी कामगिरी बद्दल वरिष्ठांनी खोपोली पोलीसांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री राकेश कदम हे करीत आहेत.