मात्र आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध सुरु आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई पुणे दृतगती मार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनामधून १ कोटी ४४ लाख रुपयांची सोने चोरीला गेले होते. चोरीला गेलेले हे सोने जप्त करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाध घार्गे यांनी ही माहिती शुक्रवारी (दि. 16) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अपर पोली अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यावेळी उपस्थित होते.
सोन्या-चादींचे घाऊक व्यापारी प्रतिक चौधरी ७ डिसेंबर रोजी हैदराबाद येथू मुंबईकडे प्रवास करत होते. त्यांची गाडी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभी होती. त्यातून २ किलो ७३२ ग्राम वजनाचे सोने चोरीला गेले होते. त्याची किंमत १ कोटी ४४ लाख होती. चौधरी यांनी या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात ७ डिसेंबर रोजी फिर्यादी दाखल केली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलीसांना सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि पोलीस अंमलदार अशी दोन पथके तयार करुन तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, या फुटेजमध्ये संशयि आरोपीच्या फोटोच्या सहाय्याने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपी हे मध्य प्रदेश मधील खैरवा, ता. मनावर, जि. धार येथील असल्याची माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतिक सावंत असे पथक मध्य प्रदेशमध्ये रवाना झाले.
गोपनिय बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्या आरोपीचे पप्पू बाबू खान मुलतानी असे असल्याचे समोर आले. तो खैरवा, ता. मनावर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. ११ डिसेंबर रोजी पोलिसांनी पप्पू बाबू खान मुलतानीच्या घरावर छापा मारला. पण घरझडतीत काही सापडले नाही. त्याच गावात राहणारा पप्पूचा भाऊ इस्माईल बाबू खान याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर खोपोली येथील ती चोरी त्याचा भाऊ पप्पू खान यानेच केल्याचे सांगून चोरलेले दागिने आपल्याकडे ठेवण्यास दिल्याची कबुली दिली २ किलो ६६४ ग्रॅम म्हणजे १ कोटी ४२ लाख २५ हजार ९४२ रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटे आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केली. मात्र आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी पोलिसांच्या हाती लागला नाही. तो फरार आहे. पोलीस आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी व त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, देवराम कोरम , पोलीस हवालदार राजेश पाटील , यशवंत झेमसे , अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांनी ही कामगिरी केली. पोलीस हवालदार राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.