पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीला अटक.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
लहान मुलाला थंड पाण्याने आंघोळ घातल्याचा राग आल्याने नवऱ्याने बायकोची हत्या केली. ही घटना वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलवी गावात घडली आहे. बायकोला ठार मारल्यानंतर आपल्यावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून नवऱ्याने आत्महत्येचा बनाव केला होता, मात्र वडखळ पोलिसांनी या प्रकरणाची उकल करून पती व त्याच्या भावास गजाआड केले आहे.
पेण तालुक्यातील डोलवी येथे राहणाऱ्या सतीश गणेश म्हात्रे (36) याचे ऋणाली (25) सोबत 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांना 3 वर्षांचा मुलगा आहे. ऋणालीने थंड पाण्याने या मुलाला आंघोळ घातली होती. याचा राग मनात धरून सतीश याने ऋणालीच्या डोक्यात अवजड वस्तूने वार करून तिला ठार मारले. प्रकरण दडपण्याकरिता ऋणालीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव केला. याकरीता सतीश म्हात्रे याने त्याचा भाऊ संदेश म्हात्रे याची मदत घेतली होती.
असा झाला खुनाचा उलगडा
मयत ऋणालीचे पार्थिव पोलिसांनी करिता पाठवले असता तिच्या डोक्यावरील कवटीचे हाड फॅक्चर झाल्याचे आढळले. डोक्यावर करण्यात आलेल्या वारामुळेच ऋणाली हिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. ऋणाली हिला मृत्यूनंतर फासावर लटकविल्याचेही पोस्टमॉर्टेममध्ये दिसून आले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी 22 डिसेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला