प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खारघर येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आयोजित पार्टीवर नवी मुबई पोलिसाच्या पथकांनी छापा मारला. छाप्यामध्ये १ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले.
या वेळी या पथकांनी सहा नायजेरियन महिलांसह १० नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. नवी मुबई पोलीस पथकांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. खारघर सेक्टर 12 मधील एका रो हाऊसमध्ये ड्रग्स आणि दारूची पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा आणि नवी मुबई पोलिसांना मिळाली. या दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या कारवाई करत हे ड्रग्स जप्त केले.
Tags
क्राईम न्यूज