प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरानच्या पायाशी असलेल्या धामणी गावाजवळ गाडी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आले होते.सदर ठिकाणी पोलीसांनी जावून खात्री केली असता सदर महिलेचा गळा आवळून खून करून महिलेचे प्रेत नदीपात्रात फेकुन दिले असल्याने लक्षात आहे. सदर घटनेवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
एखाद्या महिलेची अशाप्रकारे निर्घृण हत्या करून प्रेत फेकुन देणे या गंभीर गुन्हयाची तात्काळ उकल करणेबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी आदेशित केले होते. गुन्हयाचे घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने सदर ठिकाणी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटिव्हि फुटेज मिळुन येत नसल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणने हे पोलीसांना अतिशय आव्हानात्मक होते.
सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई पथकाने मयत महिलेच्या प्रेतावरील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच गुन्हयाच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे व इतर भौतीक दुवे यांची तत्परतेने माहिती घेत तपास तात्काळ सुरू केला. पथकाने आहेरात्र मेहनत घेवून नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील हरवलेल्या महिलांचा शोध घेतला, भौतिक पुराव्याचे दृष्टीने मिळालेल्या वस्तूवरून एका विशिष्ट ब्रॅन्डच्या घातलेल्या चप्पल वरून शोध घेण्यात सुरुवात करून कसोशिने व कौशल्याने विकत घेतलेल्या दुकानाच्या आसपासचा परिसर पिंजून काढला आणि तांत्रिक तपास करून महिलेचे सोबत असलेल्या इसमाची ओळख पटवण्यात आली.
यामध्ये सीसीटिव्ह फुटेजमधील संशयीत आरोपीताचा शोध घेत असताना तो घनसोली परिसरामध्ये असल्याचे गुप्त बातमिदारामार्फत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलच्या पथकाने सापळा लावुन रियाज समद खान (वय ३६ वर्षे, राठी- रूम नं. ५०६, म्हाडा कॉलनी, गौतम नगर, देवनार) आणि इमाण इस्माईल शेख (वय २८ वर्षे, राठी रूम नं ६११, बिल्डींग नं २ सी, इंडीयन ऑइल नगर) यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. यामध्ये ज्या महिलेचा खून झाला होता ती महिला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (वय २७ वर्षे, राठी - कोपरखैरणे( असून ती रियाज खान याची प्रेमिका असल्याचे सांगितले. त्याच्या मागे तिने लग्नाकरीता तगादा लावल्याने रियाज याने त्याचा मित्र इमान शेख यांच्या मदतीने उर्वशीचा लाल रंगाच्या बलेनो कार मध्ये तिचा रस्सीने गळा आवळुन खुन केला. तसेच दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावणेसाठी धामणी येथे गाढी नदीचे पुलावरून मृतदेह फेकुन दिल्याचे तपासात निष्पण झाले.
या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. अतिशय क्लिष्ट गुन्हयाची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई चे पथकाला यश आले आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाची सपोनि प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, पो. हवा. प्रशांत काटकर, दिपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, मधुकर गडगे, तुकराम सुर्यवंशी, अजित पाटील, जगदिश तांडेल, ज्ञानेश्वर वाघ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, सागर रसाळ, पो.ना, अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, नंदकुमार ढगे, अभय मेऱ्या, पो. शि. संजय पाटील, विक्रांत माळी यांनी केली आहे