बारामती तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व .



प्रेस मीडिया लाईव्ह :

बारामती : बारामती तालुक्‍यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. सर्व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. काही ठिकाणच्या अपेक्षित निकालने आज सकाळपासून जाहीर होण्यास सुरुवात झाली आणि अनपेक्षित निकालानंतरच्या आवाजाने बारामतीच्या प्रशासकीय इमारतीसमोरील आवार दणाणून गेले.पणदरे, कुरणेवाडी या गावांमधील धक्कादायकनिकालाने आम्हाला गावपातळीवर गृहीत धरून चालत जाऊ नका असाच गावकऱ्यांनी प्रस्थापितांना संदेश दिला.पणदरे गावात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. माळेगावचे माजी उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांच्या पॅनेलने सरपंचपदाची बाजी मारली; मात्र सत्यजीत जगताप व विक्रम कोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या पॅनेलला गावकऱ्यांनी चांगलीच दाद दिली. या पॅनेलमधील 8 उमेदवार विजयी झाले. तर तानाजी कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 7 जागा व सरपंचपदाची जागा अजित सोनवणे यांनी जिंकली.

सर्वांचे लक्ष लागून राहीलेल्या कुरणेवाडी गावात बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्‍का बसला. कुरणेवाडी गावात 6 विरुद्ध 2 जागांनी विरोधकांनी संदीप जगताप यांना धक्‍क दिला. सरपंचपदी येथे आशा किसन काळभोर या निवडून आल्या.

पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे व माणिक काळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारली. ताई माणिक काळे यांनी सरपंचपदी विजय मिळविला.सरपंचपदाच्या जागेसह 10 पैकी 10 जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले. वाघळवाडी ग्रामपंचायतीत हेमंत गायकवाड हे सरपंचपदी निवडून आले. तर वाणेवाडी गावात गितांजली जगताप या सरपंचपदी निवडून आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post