मनपा केंद्रिय मा.विद्यालय राहुल नगर,बनेवाडी येथे ‘केंद्रीय शिक्षण परिषदेचे’ आयोजन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (अब्दुल कय्यूम ) : 

 प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी *'ट्रान्सफॉरर्मिंग स्कूल'* या उपक्रमासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन सर्व केंद्रांमध्ये करण्यात येत आहे. आज बनेवाडी केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचे उदघाटन   मनपा  उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांनी केले यावेळी त्यांनी बनेवाडी आणि बन्सीलाल नगर केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांना ‘ ट्रान्सफॉरर्मिंग स्कूल ’ उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले व  आढावा घेतला.

तसेच मनपा शिक्षणाधिकारी संजीव सोनार ह्यांनी मनपा शाळांतून शंभर टक्के गुणवत्ता विकासाची हमी घेत येत्या काळात मनपा शाळातून सातत्यपूर्ण गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी  सर्व मनपा शाळा टप्प्याटप्प्याने आयएसओ करण्याचा निर्धार व्यक्त केला,ह्या प्रसंगी मनपा कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे ह्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले तर केंद्र समन्वयक भारत भुंबर ह्यांनी संपूर्ण जिल्यात आधार अपडेशन बाबतीत बन्सीलाल नगर आणि बनेवाडी केंद्र लवकरच शंभर टक्के  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहे असे सांगितले.

   श्रीमती कुमावत यांनी दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीबद्दल मार्गदर्शन केले,सदर कार्यक्रमाचे औचीत्त्याने मनपा शाळा आयएसओ करण्याचा विक्रम करणारे मुख्याध्यापक  देवेंद्र साळुंके ह्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच केंद्रान्तर्गत शिक्षकांनी आपापल्या शाळेतील घेत असलेल्या नवोपक्रमांचे वाचन करत माहिती दिली,सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या म्हणून मनपा उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड , प्रमुख अतिथी  शिक्षणाधिकारी संजीव सोनार,शिक्षण विस्तार अधिकारी भरत तिनगोटे ,कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि प्रमुख मार्गदर्शक  केंद्र समन्वयक भारत भुंबर आणि श्रीमती रईसा मॅडम यांनी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम सुचविले,या प्रसंगी केंद्र प्रमुख वारे व  केंद्रांतर्गत सर्व मुख्यध्यापक आणि शिक्षकवृंद ह्यांनी उपस्थिती लावली,परिषदेचे आयोजन केंद्रिय मुख्याध्यापक रमेश पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा बनेवाडी शाळेमार्फत केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कुलकर्णी ह्यांनी केल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post