प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (प्रतिनिधी) :-
औरंगाबाद जिल्हयातील सर्व दु व्हिलर, फोर व्हिलर, अवजड वाहने, ट्रॅक्टर, जेसीबी, घरेलू वाहने व सर्व व्यावसायिक वाहने टी.टी.ओ. फॉर्म दिल्यानंतर ताबडतोब ट्रान्सफर करण्याची मागणी गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने आरटीओ अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यासाठी वाहन बाजार, अॅटो कन्सल्टन्ट व वाहन ट्रान्सफर करणारे आर. टी.ओ. तील संबंधित व्यक्ती यांना जबाबदार धरू नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाशी चर्चा करून ताबडतोब कामामध्ये सुसुत्रता कशी येईल. या संबंधी योग्य निर्णय ताबडतोब घ्यावेत व गाडी हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर कशी होईल या संबंधिचे योग्य ते निर्णय घ्यावेत ही आपणास नम्र विनंती. निवेदनावर अध्यक्ष मकसुद अन्सारी, हफीज अली, शेख हनिफ बब्बू, हसन शाह, इम्रान पठाण, मोहम्मद इद्रीस, सय्यद ईस्माइल, शब्बीर भाई, अब्दल कलीम, आदींची उपस्थिती होती.