द हाऊस ऑफ होप संस्थेचा उपक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद : विकलांग दिनानिमित्त शनिवार, ३ डिसेंबर रोजी घाटीत रुग्णवाहिका गरजू रुग्णांना मोफत सुविधा अपंग विकलांग गरजूंना साहित्य वाटप,भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य, रुग्णवाहिका लोकार्पण, विभागीय रक्तपेढीसाठी ब्लड डोनर बेड, आणि सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार सतीश चव्हाण, मा.श्री संजयजी केनेकर (प्रदेश सरचिटणीस भाजपा)शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटीलआदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
यावेळी सर्व दिव्यांग गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्तार खान, शेख कय्यूम, किशोर वाघमारे, रहेमत अली यांनी केले आहे.