पुणे महानगरपालिके कडून चौकांचे BOT अंतर्गत सुशोभीकरण करण्याचे नियोजन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे येथे जानेवारी  २०२३ मध्ये होणाऱ्या G-20 परिषदेकरिता पुणेमहानगरपालिकेने चौकांचे BOT अंतर्गत सुशोभीकरण करण्याचे नियोजन केले आहे.त्याकरिता स्वतंत्र शहर सौंदर्यीकरण कक्ष स्थापन केला आहे. सदर कक्षामार्फत १ खिडकी योजने अंतर्गत BOT प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत आहे. आत्ता पर्यंत ४३ चौकांचे प्रस्ताव दाखल झालेले आहेत. छाननी करून १२ चौकांचे प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर प्रस्तावांचे कार्यादेश मा. शहर अभियंता, पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते दि. २२/११/२०२२ रोजी देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post