- संकटकाळात नागरीकांना तात्काळ मदत.... डायल - ११२' प्रणालीने दिले जीवनदान-



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हया पोलीस ब्रीदवाक्याला सार्थक अशी कामगिरी करीत अडचणीत असलेल्या व्यक्तीला तात्काळ पोलीस मदत पोहचविण्यामध्ये रायगड जिल्हा पोलीस दलाने यापुर्वीही आपले वर्चस्व दाखवुन दिले आहे. सदर प्रणालीव्दारे प्राप्त तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या इसमास परावृत्त करून त्यास जीवनदान दिले आहे.

दिनांक २०/११/२०२२ रोजी दुपारी ०२.४५ वाजता पोलीस नियंत्रण कक्ष, रायगड येथे डायल ११२ प्रणालीवर एक महिला नामे सेल्वी मॅनेजेस रा. नेरळ हिने कॉलव्दारे तिचा पती अन्धन मॅनेजेस हा हातात चाकू घेवून बाथरूम मध्ये गेला असल्याचे सांगुन मदत पाठविण्याबाबत कॉल आल्याने, पोलीस नियंत्रण कक्ष अलिबाग येथून तात्काळ पुढील कार्यवाही करीता नेरळ पोलीस ठाणेस कळविले. नेरळ पोलीस ठाणेकडील पोलीस पोना / रमेश बोडके व पोना / साळुंखे हे पुढील ३ मिनिटातच घटनेच्या ठिकाणी हजर झाले. सदर ठिकाणी तक्रारदार श्रीमती सेल्वी मॅनेजेस व त्यांचे नातेवाईक हजर होते व त्यानंतर पोलीस अंमलदार यांनी अन्थन मनेजेस यांस " तुम्ही बाहेर या, तुम्हाला काय मदत पाहिजे ती करतो " असे सांगितले. परंतु, बाथरूम मधुन अँन्थन यांचा काही एक प्रतिसाद न आल्याने, घरातील उपस्थित लोकांच्या सहमतीने पोलीस अंमलदार यांनी सदर बाथरूमचा दरवाजा तोडला असता अन्थन हे हातात चाक घेवून उभा असलेले दिसुन आले असता क्षणाचाही विलंब न करता पोना / बोडके व पोना / साळुंखे यांनी अॅन्थन यांच्या हातातील सुरा पकडुन हिसकावून घेतला, त्यादरम्यान सदर चाकुच्या धारेने पोना / साळूंखे यांच्या हाताला जखम झाली. हातातील चाकू हिसकावुन घेतल्याने अॅन्थन यांनी पुन्हा त्यांच्या घरातील किचन मध्ये जावून किचन मधील लोखंडी सुरा घेवुन तो स्वतःच्या गळ्यास लावून गळा कापून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तोपर्यंत पोलीस ठाणे कडील इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी दाखल झाले. असता त्यांनी मिळून अन्थन यांची समजूत घालून त्यांच्या हातातील सुरा हिसकावून घेतला. गळ्याला लावलेल्या लोखंडी सु-यामुळे गळ्याजवळ जखम झाल्याने तात्काळ त्यांना औषधोपचाराकरीता वाहनात दवाखान्यात नेण्यात आले.

घरात पत्नीसह झालेल्या वादातून अॅन्थनी मॅनेजेस हे स्वतः च्या गळ्यास लोखंडी चाकू लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच अॅन्थनी यांनी आत्महत्या करणे चुकिचे कसे याबाबत सांगुन त्यांना त्यापासून परावृत्त करण्यात आले. पोलीस पथकाने आपली तत्परता दाखवित केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. डायल ११२ प्रणालीवर मदतीसाठी दिलेल्या आर्त हाकेवर पोलीसांनी तात्काळ केलेली मदतीने श्रीमती सेल्वी मॅनेजेस यांनी सदर प्रणालीचे व पोलीसांचे आभार मानले.

पोलीस अधीक्षक रायगड श्री. सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वामध्ये व अधीक्षक रायगड श्री. अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडीत व्यक्तीपर्यंत तत्काळ मदत पोहचविण्याच्या अपर पोलीस उयेशाने पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड येथे डायल ११२ ' ही जलद प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहे. पीडीत व्यक्तींपर्यंत तात्काळ पोलीस मदत कशी पोहचली जाईल याचा सखोल अभ्यास करून पोलीस व जनता यांचे नात्याला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत

Post a Comment

Previous Post Next Post