सर्वोच्च न्यायालयानेही या भ्रष्ट राजकारणाची गंभीर दखल घेतली आहे.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

एकीकडे भाजपने देशाच्या राजकारणात आणलेल्या 'खोके' संस्कृती विरोधात जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असतानाच सर्वोच्च न्यायालयानेही या भ्रष्ट राजकारणाची गंभीर दखल घेतली आहे.भ्रष्ट लोक देशाला बर्बाद करत आहेत. पैशाच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून ते सुटतात. आम्ही असे व्हिडीओ पाहिले आहेत की, ज्यामध्ये लोकप्रतिनिधींना कोटय़वधी रुपये देऊन विकत घेताहेत, अशी लोक चर्चा करत आहेत, अशी अत्यंत कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना न्यायालयीन कोठडीऐवजी नजरपैदेत ठेवण्याच्या याचिकेवर सुनवाणी झाली. यावेळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी नवलखा यांच्या नजरपैदेस विरोध केला. नवलखा यांच्यासारखे लोक देशाला नष्ट करत आहेत. ते माओवादी समर्थक आहेत आणि त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध आहेत. नवलखा यांच्यासारखे लोक निष्पाप नसून, खऱ्या युद्धात सामील आहेत, असा आरोप राजू यांनी केला. त्यावर खंडपीठाने कठोर तोंडी टिप्पणी केली.

न्यायालयाने काय म्हटले..?

तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का कोण देशाला बर्बाद करत आहे? भ्रष्ट लोक देशाला बर्बाद करताहेत. तसेच हे लोक पैशाच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटतात 

भ्रष्टाचाऱयांवर कारवाई कोण करणार? आम्ही असे व्हिडीओ पाहिले आहेत की, ज्यामध्ये लोक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विकत घेण्यासाठी कोटय़वधी रुपयांची चर्चा करत आहेत

तुम्हाला वाटते का हे भ्रष्ट लोक देशाविरुद्ध काही करत नाहीत? भ्रष्टाचार वाढतच चालला आहे. हे लोक केवळ मौजमजा करतात. त्यांच्याकडे पैशाच्या थैल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post