कायदा हातात घेऊन रिक्षा चालकांना मारहाण करेने योग्य आहे का ?
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवरअली शेख:
पिंपरी चिंचवड येथे शाहू नगर कॉर्नर जवळ एका रिक्षा चालकाला मारहाण करण्याची घटना घडली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲप वरून बेकायदेशीर, विणा परवाना टू व्हीलर टॅक्सी वाहतूक करणाऱ्या दुचाकी धरकांमुळे रिक्षा वाल्यांची उपास मार होत आहे म्हणून रिक्षचालकांनी वारंवार तक्रार,आंदोलने केली परंतु संबंधित असलेल्या प्रशासनाकडून काहीच कठोर पावले उचलत नाहीत म्हणून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षचालकांनी चक्का जाम आंदोलन पुकारले होते.
परंतु कुठलाही आंदोलन, संप, कायद्याच्या चौकटीत राहून केलं पाहिजे, कायदा हातात घेऊन रिक्षा चालकांना मारहाण करेने योग्य आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या चालकांना पोलिसांचा चाप बसल्या शिवाय शिस्त संयम कळत नाही.