भाडेकराराचे दस्त आता ऑनलाइन 24 तासांत ऑनलाइन देण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक निबंधकांनी दिल्या

 नागरिकांना दस्ताची प्रत मिळण्यासाठी दोन-तीन दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ऑनलाइन नोंदविल्या जाणाऱ्या भाडेकराराचे दस्त आणि ऑनलाइन होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या दस्ताची नोंदणी झाल्यानंतर त्याची प्रत 24 तासांत ऑनलाइन देण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक निबंधकांनी दिल्या आहेत.यामुळे नागरिकांना दस्ताची प्रत मिळण्यासाठी दोन-तीन दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

राज्यात दस्त नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशनची सुविधा 2014 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांना त्यांच्या सदनिकेच्या पहिल्या विक्रीचा तसेच भाडेकरार (लिव्ह ऍन्ड लायन्सस) दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन दाखल करता येतो. दुय्यम निबंधकांना संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झालेला दस्त तपासून त्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करणे शक्‍य झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न येता दस्त नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करता येत असल्याने त्या सुविधेला राज्यात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी कमी झाली. त्यामुळे दुय्यम निबंधकांना इतर दस्तांच्या नोंदणीकडे लक्ष देणे शक्‍य झाले. परिणामी, कामाचा दर्जा सुधाऱण्यास मदत झाली. या सर्व पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सादर होणाऱ्या दस्तांचा निपटारा विहित मुदतीत व कालबद्ध पद्धतेने करणे ही नोंदणी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

हे आहेत आदेश…
ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमधून नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या प्रथम विक्री करारनामे आणि लिव्ह ऍन्ड लायसेन्स करारनामे दस्तांची नोंदणी त्याच दिवशी किंवा अपरिहार्य परिस्थितीत पुढील कामकाजाच्या दिवशी पूर्ण होईल, याची दक्षता सर्व नोंदणी अधिकाऱ्यांनी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत वेळेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुय्यम निबंधकांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, असे आदेश नोंदणी महानिरीक्षक यांनी दिले आहेत.

मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन नोंदविलेले दस्त 24 तासांत ग्राहकांना मिळावेत, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात येत होती. त्यास यश मिळालेले आहे. जे नागरिक भाडेकरु म्हणून राहतात, त्यांना रहिवास पुरावा, वाहन खरेदी, पासपोर्ट आदी कारणांसाठी भाडेकराराचा दस्ताची मागणी होते. हा दस्त वेळेत नागरिकांना मिळाल्याने त्यांची गैरसोय टळणार आहे.

सचिन शिंगवी, असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट

Post a Comment

Previous Post Next Post