शिरुर शहरामधे संविधान दिन उत्साहानं साजरा.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

    अन्वरअली शेख :

पुणे शिरूर  : शिरूर शहरात आनंदी व उत्साही वातावरणात   संविधानदीन साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व सर्व समविचारी सहयोगी संघटनांच्या वतीने संविधान स्तंभ शिरूर (पुणे नगर रोड, संविधान चौक) येथे उद्देशिका वाचन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने शाळकरी मुलांनी मोठ्या संख्येने  उपस्थिती नोंदविली. सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना आयोजकांद्वारे खाऊ वाटप करण्यात आले.

इयत्ता पहिलीचा विद्यार्थी सिद्धार्थ लोंढे यानी उद्देशिका वाचन केले.

याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चा कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण,

बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोजभाई सय्यद.

भारतीय बहुजन पालक संघ राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे इ.

मान्यवरांनी संविधानाची उपयुक्तता यावर आपले मनोगत व्यक्त केले.  

संविधान दिनानिमित्ताने शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. ॲड प्रसाद बोरकर साहेब यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आणि संविधान स्तंभाला पुष्पहार अर्पण करून शासकीय अभिवादन केले.

शहरातील नामवंत डाॅ अतुल बेद्रे, 

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद. 

प्रवासी संघाचे अनिल बांडे. 

मनसेचे रवी लेंडे, ॲड. आदित्य मैड. 

माजी नगरसेवक शशिकांत माने, 

बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहराध्यक्ष समाधान लोंढे. 

राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यांक सेल तालुका उपाध्यक्ष युवराज सोनार,

लहुजी शक्ति सेने चे विशाल जोगदंड, सोनू काळोखे, 

बहुजन मुक्ती पार्टी चे अशोक गुळादे. 

बहुजन समाज पक्षाचे रमेश कांबळे, भीमराव तराळ, 

आम आदमी पार्टी चे अनिल डांगे, 

भारत मुक्ती मोर्चा चे विजय भोइरकर, शाम झेंडे, शंकर चाबुकस्वार, रघुनाथ शिंदे , शब्बीर सय्यद, बबनदादा गायकवाड, विलास देठे, मच्छिंद्र गायकवाड, गुणवंत उबाळे, गणेश गायकवाड आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


   

Post a Comment

Previous Post Next Post