सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेवानिवृत्त शिक्षकेतर - कर्मचाऱ्याने व्यक्त केली वेगळी कृतज्ञता.....



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता समिती  पाच वर्षानंतर  भेट देत  आहे . यादरम्यान नियमाप्रमाणे विद्यापीठातील शैक्षणिक व संशोधनात्मक सर्वेक्षण केले जाणार आहे . त्यानुसार विद्यापीठाला दर्जा दिला जाईल. याकरिता राष्ट्रीय मूल्यांकन व  मान्यता  समितीचे सदस्य भेट देणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील   डॉ. तुषार निकाळजे या सेवानिवृत्त  शिक्षकेतर - कर्मचाऱ्यांने  राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता समितीस  ई-मेल द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची  गुणवत्ता वाढण्यासंदर्भातील काही पुरावे दिले आहेत. डॉ. तुषार निकाळजे  हे भारतातील नवहे  तर जगातील पहिले शिक्षकेतर-  कर्मचारी आहेत.डॉ. तुषार निकाळजे यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी, लंडन यामध्ये झाली  आहे. डॉ. तुषार निकाळजे यांनी आजपर्यंत दहा पुस्तके लिहीलेली आहेत. या पैकी तीन पुस्तके सात विद्यापीठे व पाच स्वायत्त महाविद्यालये  यांच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तके म्हणून मान्यता प्राप्त आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवेच्या कालावधीत ५८  लेख, ३  राष्ट्रीय,  २ आंतरराष्ट्रीय, २ राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला होता. तसेच अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी या ब्रेल- इंग्रजी पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली   आहे.  त्यांना आजपर्यंत भारतातील पाच राज्यांनी व दोन परदेशी शैक्षणिक संस्थांनी व विद्यापीठांनी शैक्षणिक व संशोधन  कार्याबद्दल पुरस्कार दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सकारात्मक शैक्षणिक व संशोधनात्मक वातावरणामुळे  हे शक्य झाले, असे डॉ. तुषार निकाळजे यांनी   राष्ट्रीय मूल्यांकन कार्यालयास   कळविले आहे. 

                  डॉ. तुषार निकाळजे यांनी ही सर्व माहिती नुकतीच राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता समितीस पाठविली  आहे. या अनुषंगाने डॉ. तुषार  यांनी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुल्यांकनांमध्ये , गुणांमध्ये व पॉईंट मध्ये या कार्याची नोंद व्हावी,अशी विनंती  राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता  समितीस केली आहे. डॉ. निकाळजे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याबद्दल  व्यक्त केलेली  ही कृतज्ञता शैक्षणिक क्षेत्रात वेगळा पायंडा पाडणारी  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post