महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’( आझम कॅम्पस)च्या वतीने महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त ८ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिवादन मिरवणूक काढली. ही मिरवणूक सोमवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ते साडे दहा या वेळेत आझम कॅम्पस ते महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक(गंज पेठ)या मार्गावर काढण्यात आली.
मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले तर संस्थेचे सचिव इरफान शेख, व पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. संस्थेच्या ३० आस्थापनांमधील ८ हजार विद्यार्थी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.महात्मा फुलें,सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसले होते.दरबार ब्रास बँड,बग्गी, बैलगाडी,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी झाले.इरफान शेख,शाहिद इनामदार,वाहिद बियाबानी,असिफ शेख,अब्दुल वहाब शेख यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य,विश्वस्त आणि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक या अभिवादन मिरवणुकीत सहभागी झाले.फुले वाड्यात या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना वंदन केले.
मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा होता .
अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १८ वे वर्ष होते. दरवर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’( आझम कॅम्पस)च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.