संविधान तसेच पक्ष स्थापना दिनानिमत्ताने आम आदमी पक्षाकडून पुणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : २६ नोव्हेंबर हा संविधान दिन तसेच आम आदमी पक्षाचा स्थापना दिन! यानिमित्त आज पुणे शहरात पक्षाच्या वतीने शहर कार्याध्यक्ष, राज्य संघटक *विजय कुंभार* यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली संपन्न झाली. सकाळी १० वा. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पक्षाच्या १० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बाईक रॅली शहरातील विविध भागातून जात कोथरुड - डेक्कन - शनिवार वाडा चौक - येरवडा - कल्याणी नगर - मुंढवा - हडपसर - वानवडी - कात्रज - स्वारगेट - जिल्हाधिकारी कार्यालय असा जवळपास ६० किमीचा प्रवास पूर्ण केला.

रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञता अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई शहरावर झालेल्या भीषण २६/११ हल्यातील शहीद जवानांना *श्रद्धांजली* अर्पण करण्यात आली.

_"देशात सत्ताधाऱ्यांकडून घटनात्मक संस्थांची खुलेआम गळचेपी होत आहे, हा संविधानास एक प्रकारे धक्काच आहे. अशा वेळी आम आदमी पक्ष संविधान विरोधी शक्तींच्या विरोधात सातत्याने जनसामान्यांचा आवाज बुलंद करत आहे.", विजय कुंभार

यावेळी आप शहर समन्वयक डॉ. अभिजीत मोरे, शहर संघटक एकनाथ ढोले, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, आम आदमी रिक्षा संघटना अध्यक्ष आनंद अंकुश,  वानवडी विभाग प्रमुख विद्यानंद नायक, कर्वेनगर वारजे विभाग प्रमुख प्रा. सुहास पवार व सुशील बोबडे, कोथरूड विभाग प्रमुख रोहन रोकडे, भवानी पेठ विभाग प्रमुख किरण कांबळे, कसबा विभागप्रमुख किरण कद्रे, बिबवेवाडी विभाग प्रमुख घनश्याम मारणे, हडपसर विभाग प्रमुख सचिन कोतवाल, येरवडा विभाग प्रमुख गणेश ढमाले व अनिल धुमाळ, नगर रोड विभाग प्रमुख मनोज फुलावरे, कोंढवा विभाग प्रमुख साजिद खान, सिंहगड विभाग प्रमुख किशोर मुजुमदार, पी एम पी एम एल सेल प्रमुख सेंथील अय्यर, जय भीम मोर्चा पुणे शहर अध्यक्ष मिराताई, सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष सरफराज मोमीन, व्यापारी सेल पुणे शहराध्यक्ष अनिल कोंढाळकर, उपाध्यक्ष पियूष हिंगणे,  जलहक्क समितीचे आबासाहेब कांबळे, आरोग्य समितीचे निरंजन अडागळे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post