मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झालेयात सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला.

याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेन च्या साहाय्याने बाजूला केले.तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कोल्हापूर येथील असणारे पीकअप वाहनचालक लक्ष्मण कोकरे हे कोल्हापूरहून मुंबईकडे कांदे बटाटे आणण्यासाठी निघाले होते. चालकाच्या म्हणण्यानुसार माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले. यात सातजण जखमी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post