रॅपीडो बाइक टॅक्‍सी'च्या संचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 बाइक सर्व्हिस विरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी 28 नोव्हेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा दिला होता.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : रिक्षा चालकांच्या विरोधामुळे मागील काही दिवस चर्चेत असलेल्या 'रॅपीडो बाइक टॅक्‍सी'च्या संचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाइक सर्व्हिस विरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी 28 नोव्हेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा दिला होता.यापार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तक्रार दाखल केली आहे

मे.रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपीडो) कंपनीचे संचालक जगदीश पाटील यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले (वय 38 रा.येरवडा,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात ऑनलाइनरित्या बेकायदेशीर बाइक टॅक्‍सी सर्व्हिस सुरू असल्याच्या अनेक तक्रारी रिक्षा संघटनांकडून आरटीओकडे आल्या होत्या. त्यानुसार उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते, त्यांच्या तपासात ही सेवा सुरू असल्याचे दिसले. त्यानंतर सेवा देणाऱ्या “रॅपीडो’ कंपनीस सेवा बंद करण्यास सांगण्यात आले होते, त्यांना तीन वेळा नोटीस बजाविण्यात आली होती. याप्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करत आहे.

केंद्र मोटार वाहन समुच्चक मार्गदर्शक तत्वे 2020चे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र, त्याची पूर्तता न करताच कंपनीने व्यवसाय सुरु केला. “रॅपीडो’ कंपनी विरोधात फेब्रुवारी 2021 पासून पुणे शहरात विविध वाहतुकदार संघटनेकडून आंदोलने सुरू आहेत. कंपनीच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता, त्यामुळे आरटीओकडून जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 609 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 अंर्तगत कारवाई केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post