खाजगी हॉस्पिटलची नफेखोरी ; आरोग्यमंत्र्यांच्या दरबारी

 शहरातील हॉस्पिटल विरोधात " अपना वतन " संघटनेची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार


प्रेस मीडिया लाईव्ह :

    पिंपरी चिचंवड शहरातील खाजगी व धर्मादाय *रुग्णालयाच्या ,माध्यमातून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ . तानाजी सावंत यांची पुणे येथे भेट घेतली.* त्यावेळी वैद्यकीय नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई कारण्याबतचे निवेदन त्यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ . तानाजी सावंत यांनी शहरातील रुग्णालयांची चौकशी कर्णयचे आश्वासन दिले . सादर बैठकीत अपना वतन संघटनेच्या महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक हमीद शेख , महिला उपाध्यक्ष निर्मला डांगे , गणेश जगताप , प्रकाश पठारे , उस्मान शेख , समीर अत्तार , रमेश बोटकुले आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post