प्रेस मीडिया लाईव्ह :
चिखली कुदळवाडी येथील नवीन मराठी शाळा मेन रोडवर आहे,तेथे विद्यार्थ्यांची शाळा भरताना व सुटताना मोठी गर्दी होते.तेथील सुरक्षा निरीक्षण केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणिस व चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी फ क्षेत्रीय जनसंवाद सभेमध्ये खालील मागण्या केल्या.
१) या शाळेच्या समोरील मेन रोडवर गतिरोधक बसवा
२) वाहन चालकांना इशारा देणारे इथे शाळा आहे,असे आकाश चिन्हांचे फलक लावा.
३) शाळापरिसरात साथ रोग नियंत्रण साठी औषध फवारणी,औष्णिक धुकीकरण करा.
याबाबत दीपक गुप्ता म्हणाले की,केएसबी चौक ते चिखली गाव हा शहरातील मोठा सेवा रस्ता आहे.येथे मोठ्या प्रमाणात वेगवान अवजड वाहने,चारचाकी,दुचाकींची वर्दळ असते.मुलांच्या सुरक्षेसाठी येथे गतीरोधक असलेच पाहिजे,त्यामुळे शाळा परिसरात वेग नियंत्रण होऊन शाळादर्शक फलकामुळे वाहन चालक सावधानतेने वाहने चालवतील.
या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांनी स्वीकारून तातडीने कारवाई सुरू केली आहे