चान्नी पोलिसांची शिरपूर येथे कारवाई; आरोपी फरार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पातुर तालुका प्रतिनिधी : राहुल सोनोने (मळसुर)
कत्तलीसाठी गोठ्यात लपवून ठेवलेल्या पाच गायी व गोन्ह्याला पोलिसांच्या कारवाईमुळे जीवदान मिळाले. ही कारवाई शिरपूर येथे बुधवारी रात्री चान्नी पोलिसांनी केली.
चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत शिरपूर येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या परिसरात एका गोठ्यात कत्तलीसाठी पाच गायी व एक गोन्हा लपवून ठेवल्याची माहिती मिळताच ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, योगेश डाबेराव आदींनी बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास धाड टाकली. या कारवाईत एक लाख दहा हजार रुपये असे एकूण सहा जनावरे जप्त करण्यात आली.
माहिती मिळाली की, शिरपूर येथे कत्तलीसाठी जनावरे गोठ्यात ठेवण्यात आली आहेत. त्यावरून बुधवारी धाड टाकून पाच गायी व एक गोन्हा जप्त करून गोरक्षकांच्या ताब्यात दिले असून, आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- योगेश वाघमारे, ठाणेदार, पोलीस स्टेशन, चान्नी
होण्यास यशस्वी झाला. चान्नी पोलिसांनी सहा जनावरे जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केली तसेच रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून जनावरे गोरक्षणमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आरोपी घटनास्थळावरून फरार आहे.