प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
नवीन पनवेल सेक्टर 3 येथील भूखंड क्रमांक 56 आणि 57 या गार्डन भूखंडावर नव्याने सुशोभीकरण होत आहे. ते होत असताना सदरच्या प्लॅनिंग मध्ये दोन्ही ठिकाणी शौचालय नव्याने उभारणी होत आहे. सदर गार्डन पासून 50 ते 100 मीटर अंतरावर दोन्ही बाजूवरील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक शौचालय आहेत. तसेच त्या परिसरात राहणाऱ्या आणि त्या परिसरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सद्यस्थितीमध्ये सुरू असलेली दोन्ही शौचालय आहेत. असे असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असलेल्या गार्डनमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात आल्याने नागरिकांच्या पैशाचा व्यवस्थित वापर होत नाही तसेच गार्डन मधील जागा शौचालयासाठी विनाकारण वापरली जात होती.
या काही गोष्टींमुळे तेथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचा या नव्याने होत असलेल्या शौचालयाला विरोध आहे. ही तक्रार विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडे स्थानिक नागरिकांसोबत नवीन पनवेलचे शेकाप नेते प्रभाकर कांबळे यांनी केली. सदरची गोष्ट संबंधित विभागातील अधिकारी राजेश कर्डिले यांच्यासोबत प्रत्यक्षरीत्या साईट विजीट करून नागरिकांच्या समवेत चर्चा करून प्रीतम दादांनी सदरचे शौचालय नागरिकांना नको असल्या कारणाने ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांनी सुद्धा नागरिकांसमोर शौचालय उभारण्यात येणार नाही या गोष्टीसाठी दुजोरा दिला. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रीतम म्हात्रे यांनी शौचालय त्वरित रद्द करण्यासाठी आपण निर्देश द्यावे अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात आयुक्त देशमुख यांनी संबंधित विभागाला सदर शौचालय रद्द करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
कोट
नागरिकांची तक्रार आल्यावर त्या ठिकाणी पाहणी केली असता शौचालयाची आवश्यकता नाही हे पालिका अधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्यासमोर मान्य केले आणि संबंधित शौचालयाचे बांधकाम आम्ही थांबवतो असे सांगितले. आम्ही अशा प्रकारची पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अजूनही विकास कामे जी सुरू आहेत त्या ठिकाणी अनावश्यक अशाप्रकारे जर जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असेल तर आयुक्तांनी त्यावर लक्ष घालून त्वरित ते बांधकाम थांबवावे असे विनंती केली.:- प्रितम जनार्दन म्हात्रे,विरोधी पक्षनेते पनवेल महापालिका