प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
नवी मुंबई : बडोदा महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये दलालांनी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. भिवंडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून त्यांचा मोबदला देण्यात आला आहे. आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागी बनावट शेतकरी उभे करून सुमारे 12 कोटी रुपये हडपल्याची घटना समोर आली होती. पुन्हा एकदा भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एका वयोवृद्ध मृत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी दलालांच्या साखळीने मृत महिलेच्या जागी एका महिलेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिवंत दाखवून तब्बल 58 लाख रुपये दलालांच्या साखळीने हडप केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.
अजब घोटाळा आता मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात..
'मुंबई -बडोदा' महामार्गातील अजब घोटाळा आता, मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात गेल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे लवकरच संबधित जमीन घोटाळा करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या दलालांच्या साखळीवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सुरु केली आहे.
भूसंपदानातील अनेक व्यवहार बाबत साशंकता
मुंबई बडोदा महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात असल्याने यामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपादीत शेतजमिनीस बाजारभावापेक्षा पाच पटीने दर देण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारने ठरवले आहे. या धोरणानुसार आतापर्यंत कोट्यवधी रुपये बहुतांश बाधित शेतकऱ्यांना मिळाले असताना, या संधीचा फायदा घेत काही राजकीय दलालांच्या टोळीने शासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यांनी संगनमताने या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर भूसंपदानातील अनेक व्यवहार बाबत साशंकता व्यक्त केली जात असतानाच, जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी दलालांच्या साखळीने मृत महिलेला जिवंत दाखवण्याचा अजब प्रकार भिवंडी तालुक्यातील दुगाड गावात समोर आला.