प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या राज ठाकरे तसेंच मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मेलद्वारे करण्यात आलेली आहे. भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जी व्यक्तव्य केली आहेत, तसेच काही पुरावे सादर केले आहेत. त्याचे लोकशाही मार्गाने पुराव्याणीशी खंडण केले जाऊ शकते. परंतु हे न करता एखाद्याच्या देशव्यापी कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचे व चेतावणी खोर भाषा करून राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडविणे हे लोकशाहीच्या व्याखेत बसत नाही, अंस भीम आर्मीनं म्हटले आहे.
दरम्यान, एखाद्याच्या जाहीर कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांन विरोधात पोलिसांनी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक मार्गाचा अवलंब करावा, अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. चेतावणी खोर भाषा आणि बेकादेशीर आंदोलने करायला लावून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरुण पीडिचे भविष्य खराब करु नये. तरुणांसाठी रोजगार, उधोगधंदे व नोकऱ्या कशा मिळतील यावर काम केल्यास ते राज ठाकरे व त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांसाठी फायद्याचे ठरेलं. असा सल्ला देखील भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.