प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, किरण देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांचासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तसेच पोलीस दलातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
Tags
मुंबई