प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : आम आदमी पार्टीने नुकताच प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यामध्ये 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.
विविध आंदोलनांच्या माध्यमातून शहरातील ज्वलंत विषयांवर केलेली अभ्यासू मांडणी, सहज सोप्या भाषेत चर्चा करण्याची शैली यामुळे त्यांना हे पद देण्यात आले. ही नियुक्ती म्हणजे पक्षाची भूमिका परखडपणे मांडण्याची जबाबदारी समजून काम करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. निवडीचे पत्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी दिले.
Tags
कोल्हापूर