दर्जेदार रस्त्यांच्या मागणीसाठी 'आप'चे आंदोलन.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचे पॅचवर्क व दुरुस्तीचे काम महापालिकेने सुरू केले आहे. परंतु रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी महापालिकेकडे कोणताही क्वालिटी कंट्रोल प्लॅन उपलब्ध नसल्यामुळे केवळ काहीच महिन्यात रस्ते खराब होत आहेत. महापालिकेत चालणारी टक्केवारी देखील सुमार रस्त्यांसाठी कारणीभूत आहेत. एकाच ठेकेदाराला 65 रस्त्यांपैकी 27 रस्त्यांची कामे दिल्याने पावसाळ्या आधी वर्क ऑर्डर देऊनही अद्याप काम सुरू झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर 'टक्केवारी हटाव, रस्ते बचाव' या मोहिमेद्वारे आम आदमी पार्टीच्या वतीने दर्जेदार रस्त्यांसाठी महापालिकेसमोर 'जागर' आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी महापालिकेभोवती तुतारीच्या गजरात उलट्या रिक्षा फिरवून खराब रस्त्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये सामील झालेल्या रिक्षाचालकांनी संख्या लक्षवेधी होती.
आज उलटी रिक्षा फिरवून प्रशासनाने रस्ते बांधकामात केलेल्या उलट्या कामांचा निषेध आम्ही याद्वारे केलेला आहे. शहरात होणारे रस्ते दर्जेदार व टिकाऊ व्हावेत यासाठी महापालिकेने क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करावा, वॉर्ड निहाय नागरिकांची रस्ते दक्षता समिती करावी आदी मागण्या प्रशासनाकडे आम्ही करत आहोत. जोपर्यंत शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडे प्रस्तावित 100 कोटींचा निधी महापालिकेकडे वर्ग होत नाही तोपर्यंत हा जागर सुरूच राहणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. मागण्यांचे निवेदन महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले. जागर आंदोलनातील उलटी रिक्षा प्रदक्षिणा या उपक्रमाचे नियोजन संतोष घाडगे आणि राकेश गायकवाड यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, दिलीप पाटील, शरद पाटील, उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, अभिजीत कांबळे, राकेश गायकवाड, आदम शेख, लाला बिरजे, बाबुराव बाजारी, मंगेश मोहिते, संजय नलावडे, प्रभाकर चौगुले, दुष्यंत माने, विजय हेगडे, ऍड. चंद्रकांत पाटील, डॉ. कुमाजी पाटील, भाग्यवंत डाफळे, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, रविन्द्र राऊत, मयूर भोसले, रवींद्र ससे, प्रसाद सुतार, आनंदराव चौगुले, सचिन वणीरे, महेश घोलपे, प्रकाश हरणे, आदित्य पोवार, तेजस चव्हाण, चेतन चौगुले, अमरसिंह दळवी, अश्विनी साळोखे, आदी उपस्थित होते.