प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : खून, खंडणी, मारामारी, अपहरण आणि सावकारीच्या प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकल्यामुळे कोल्हापूर मध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ताराराणी चौकामध्ये भव्य पोस्टर उभारण्यात आले आहे. अट्टल गुंड अमोल भास्कर याने हे पोस्टर लावले आहे. यावर अमोल भास्करचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख करण्यात आला आहे.
राजेश क्षीरसागरांच्या वाढदिवसाच्या या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही फोटो असून त्याच्यासोबत अमोल भास्करचा फोटो झळकला आहे. आज सकाळी हे पोस्टर पाहिल्यानंतर सर्वसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.