प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
कोल्हापूर, राजारामपुरी पाच बंगल गल्ली नंबर.तीन येथील निखिल शहा हे आपल्या मित्राला सोडणे साठी राजारामपुरी येथे गेले असता त्यांचे खिशातील पैशाचे पाकीट त्या सोबत लायसन्स, ओटींग कार्ड, एटीएम कार्ड हरवल्याचे मित्राला घरी सोडून आलेनंतर लक्षात आले.
सदरचे पाकीट हे मानव आधिकार संघटनेचे कोल्हापूर शहर अध्यक्ष मा. श्री अर्जुन जगन्नाथ बुचडे यांना सापडले होते ते त्यांनी आज राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकारी दीपिका जोजळे मॅडम यांच्याकडे सुपूर्द केले. तर जोजळे मॅडम यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल धनाजी चिरमुरे यांना निखिल शहा यांचा पत्ता शोधून संपर्क साधण्याच्या सुचना दिल्या.त्याप्रमाणे कॉन्स्टेबल धनाजी चिरमुरे यांनी संपर्क साधला असता ते बाहेर असल्यामुळे त्यांनी आपले दाजीना पोलीस स्टेशनला पाठविले व सदरचे पाकीट अर्जुन बुचडे व कॉन्स्टेबल धनाजी चिरमुरे यांनी निखिल शहा यांच्या दाजी यांचेकडे सुपूर्द केले.