प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून कोल्हापूर महानगरपालिकेचा कर्मचारी ठार झाला. हा ट्रॅक्टर दत्त दालमिया साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता.बंडेराव जाधव (वय 55, रा. पाडळी बुद्रुक, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) असे ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंडेराव जाधव वाघापूरमधील आहेत. ते पाडळी बुद्रुकमध्ये वास्तव्यास होते. कोल्हापूर महानगरपालिकेत ते कार्यरत होते. जाधव नेहमीप्रमाणे कामावर जात असताना प्रयाग चिखलीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.दुर्दैव म्हणजे दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच त्यांचा अपघात होवून ते कोम्यात गेले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले. अन् पुन्हा अपघातातच त्यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.