प्रेस मीडिया लाईव्ह :
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (बालदिन) तसेच आपले मानवाधिकार फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेश उमराठकर यांच्या जन्मदिनानिमित्त राधेश्याम मित्र मंडळ, भावेघर ता.वाडा, जि.पालघर यांच्या माध्यमातून आपले मानवाधिकार फाउंडेशन, वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल & आयसीसीयु आणि Dr.jadhav's dental clinic यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य, दंत व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
धकाधकीच्या जीवनामध्ये आयुष्य सुदृढ राहावे यासाठी वाडा हॉस्पिटल च्या माध्यमातून नेहमीच खेडोपाड्यात राहणाऱ्या सर्वसामान्यांना योग्य आरोग्य तपासणी तसेच आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आयोजन केले जाते. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आरोग्य सुदृढ असेल तर आपला देश आणखी प्रगतीपथावर जाईल असे आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांनी यावेळी सांगितले. या आरोग्य शिबिर मध्ये मोफत जनरल तपासणी व इतर आजारावर मार्गदर्शन, मोतीबिंदू तपासणी व मार्गदर्शन, आवश्यकतेनुसार E.C.G., दंत तपासणी, आवश्यकतेनुसार इ. तपासण्या, डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक डॉ दिपेश पष्टे, राज्य अध्यक्ष गणेश उमराठकर, वाडा हॉस्पिटल चे डॉ.अमित शर्मा, डॉ.श्रेयस जाधव, कल्पेश पष्टे तसेच वाडा हॉस्पिटल चे कर्मचारी, राधे श्याम मित्र मंडळ चे पदाधिकारी व भावेघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.