प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेले प्रलंबित प्रोत्साहनपर अनुदान द्यावे , सोयाबीनवर येलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी , लम्पी आजाराने मेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज इचलकरंजी येथे शिरढोणच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाकडून नायब तहसीलदार संजय काटकर यांनी निवेदन स्विकारले.तसेच सदर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी ,अन्यथा 24 नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान सन 2019 ची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे.परंतु ,अनेक शेतकऱ्यांची नावे प्रलंबित असतानाही शासनाने आचारसंहितेचे कारण सांगून अनुदान देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे . वास्तविक खरीप हंगाम 2022 मध्ये शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले. त्या पिकावर येलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा उतरवला होता.त्यामुळे एचडीएफसी विमा कंपनीने त्याबाबतचा पंचनामा देखील केला आहे. पण जाणीवपूर्वक फक्त दोन मंडळांसाठी येलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे खरी वस्तुस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शिरोळ तालुक्याला येलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे नमूद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.तसेच लम्पी या आजारामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शासनाने लम्पी बाधित आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांसाठी नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले आहे. मात्र, अजूनही प्रत्यक्षात तसे काही झाल्याचे दिसून येत नसल्याचे दिसत आहे.या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने जाहीर केलेले प्रलंबित प्रोत्साहनपर अनुदान द्यावे , सोयाबीनवर येलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ,
लम्पी आजाराने मेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज इचलकरंजी येथे शिरढोणच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाकडून नायब तहसीलदार संजय काटकर यांनी निवेदन स्विकारले. तसेच सदर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा 24 नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना शिष्टमंडळात शिरढोण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे के.बी.चौगुले , विश्वास बालिघाटे , संतोष मगदूम ,सुमतीनाथ शेट्टी , मनोहर मुंजगोडा , अनिल शिंदे यांचा समावेश होता.