प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी येथे डीकेटीई शिक्षण संस्थेेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मेकअप परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासह झालेल्या परीक्षांची फोटो काॅपी मिळावी ,या मागणीसाठी आज स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सौरभ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ,अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.यावेळी सौरभ शेट्टी यांनी डीकेटीई संस्थेचे व्यवस्थापन आपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करुन या अन्यायाबाबत आतास्वस्थ न बसता आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला.
इचलकरंजी येथील डीकेटीई शिक्षण संस्था ऑटोनोमस असल्याने या संस्थेअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालय अंतर्गत घेतल्या जातात. जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परीक्षा देण्याची परवानगी असते; परंतू डीकेटीई ही एकमेव संस्था तीन वेळा परीक्षा घेत नसल्याने अभियांत्रिकीचे विद्यार्थी नापास होतात आणि त्यांचे इयर डाऊन होत आहेत ,असा आरोप स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांनी केला आहे.तसेच डीकेटीई संस्थेच्या व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे
या महाविद्यालयात दीडशेहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. याबाबत स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने याबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.तसेच
यावर विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट यूजीसी सोबत असल्याने यासंदर्भात सगळी माहिती घेऊन विद्यापीठाने डीकेटीई महाविद्यालयास पत्र पाठवण्याचे आश्वासन दिले; पण सर्वस्व निर्णय संबंधित स्वायत्त महाविद्यालयाचा असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यावर स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून डीकेटीई या महाविद्यालयाच्या बाहेर
सदर प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सौरभ शेट्टी यांनी इशारा दिला होता.त्यानुसार या संघटनेच्या वतीने अभियांत्रिकी
विद्यार्थ्यांच्या मेकअप परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासह झालेल्या परीक्षांची फोटो काॅपी मिळावी ,या मागणीसाठी
आज डीकेटीई महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी
आंदोलकांनी
अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ न बसता आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश मगदूम , विकास चौगुले ,हेमंत वणकुंद्रे , अविनाश कोरे ,बाळगोंडा पाटील ,
विनय पाटील, रोहित पुदाले, अण्णा सुतार यांच्यासह विद्यार्थी व पालक सहभागी झाले आहेत.