प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांना दोन लाखाची लाच घेताना आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे. दळवी यांनी एका व्यक्तीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात काम करून देण्याचे दळवी यांनी मान्य केले. आणि लाचेची रक्कम घेऊन त्या व्यक्तीला आपल्या गोंधळपाडा येथील राहत्या घरी बोलावले. त्या व्यक्तीने याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली. या कार्यालयातील अधिका-यांनी सापळा रचून दळवी यांना त्यांच्या घरी लाच घेताना रंगेहात पकडले. पकडताच दळवी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक ज्योति देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि त्यांच्या सहका-यांनी ही कारवाई केली.