ब्रेकिंग न्यूज : अंबरनाथ मध्ये बैलगाडी शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार ; 15 ते 20 राउंड फायर झाल्याचा अंदाज

 


प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 बैलगाडा शर्यतींचा मौसम सुरू होताच आता बैलगाडा शर्यतीवरून दोन गटातील वादावादी समोर येऊ लागली आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातूनच आज अंबरनाथच्या एका नामांकित हॉटेल समोर दोन गटात वादावादी झाली.या वादातूनच हॉटेल परिसरात अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.


पनवेल मधील पंढरी फडके आणि कल्याणचे राहुल पाटील ही दोन नावे बैलगाडा शर्यतीत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षीचा मोसमात या दोन्ही गटातील बैलगाड्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता बाळगण्यात आली होती. मात्र आता बैलगादी शर्यती पुन्हा सुरू झाल्याने हे दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत..

बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेला बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना कळताच राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले.

बैल गाडी शर्यतीवर  शासनाने बंदी घालावी  : नागरिकांतून मागणी 

बैल गाडी शर्यतीवर  शासनाने बंदी घालावी  अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे .अन्यथा या नागरिकांना आपला जीव गमवावा लागेल या बाबत शासनाने आता कटोर पाऊले उचलून बैल गाडी शर्यतीवर   बंदी घालण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post