घरगुती वाद : महिला गंभीर जखमी
प्रेस मीडिया लाईव्ह :
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील दुधलम येथे बाप-लेकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, एक जण जखमी झाला आहे. पिंजर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमीला मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुधलम आहे.
येथील पंडित कुटुंबामध्ये बुधवारी रात्री नऊ वाजता घरगुती वाद झाला. या वादात प्रताप विठ्ठल पंडित (५२) व सुरज प्रताप पंडित (२६) यांची रॉड व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर अनिता प्रताप पंडित (४५) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथे आणण्यात आले. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशन करीत