प्रेस मीडिया लाईव्ह :
जनकल्याण सामाजिक संस्था कोल्हापूर व सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज ऑफ एज्युकेशन पेठ वडगाव च्या प्र प्राचार्य सौ श्वेता सचिन चौगुले- निर्मळे यांना दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार अहमदनगर येथे मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी मतदार संघ यांच्यामार्फत प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा माऊली संकुल अहमदनगर येथे पार पडला.
सौ श्वेता चौगुले - निर्मळे ह्या अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये बीएड महाविद्यालयात प्र. प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात ही अग्रेसर आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक समित्या वरती त्यांची नियुक्ती आहे. सामाजिक कार्यामध्ये त्या हिरारीणे पुढे असतात. यापूर्वी त्यांना विविध पुरस्काराने गौरवलेले आहे त्यामध्ये नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ,डॉ एपीजे अब्दुल कलाम अवॉर्ड ,सकाळ प्रेरणा पुरस्कार, दिशा पर्यावरण पुरस्कार ,आदर्श पुरस्कार ,संत रोहिदास गौरव पुरस्कार ,स्पेशल अचीवमेंट अवॉर्ड अशा वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात शिर्डी मतदार संघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच नाशिकचे खासदार , सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे , जनकल्याण सामाजिक संस्था कोल्हापूर चे अध्यक्ष उदयसिंह पाटील व किशोर शेट कालडा उपस्थित होते