प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झाला आहे. कल्याणी हिच्या मृत्यूची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.कल्याणी हिने अत्यंत कमी वेळामध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा येथे मध्यरात्री डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधव हिने भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली.
कल्याणी जाधव हिने काही दिवसांपूर्वीच हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हॉटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणी हिचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.