पूणे: हॉटेल मध्ये लागलेल्या आगीत 10 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुणे शहारातील सदाशिवपेठ मध्ये एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशमन दलाचे 3 वाहने दाखल झाली.

हॉटेलमधून 3 सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये एक 10 वर्षांची मुलगी अडकली होती.या मुलीला जवानांनी बाहेर काढले असून जखमी अवस्थेत अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान या चिमुरडीचा मृत्यू झाला.

दुकानाला आग कशामुळे आणि का लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. मात्र, या चिमुरडीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.सुट्टीच्या दिवशी आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत बँकेतील साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी परळी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये बँकेतील काही रेकॉर्ड फाईल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग कशाने लागली याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र बँकेतील काही कागदपत्र तसेच वस्तूंचं नुकसान आगीत झालं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post