शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. राऊतांचा कारागृहातील मुक्काम 13 दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, संजय राऊतांना 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती.

संजय राऊतांवर  नेमके आरोप  काय..?

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post