श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' साजरा



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी

श्री दत्त पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखिका सौ.नीलम माणगावे (जयसिंगपूर)उपस्थित होत्या. 

 कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. सौ. माणगावे यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवावरून विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. माणसे, समाज, राजकारण इत्यादी वाचायला शिकणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. 'वाचाल तर वाचाल' हा खूप मोलाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. निरंतर वाचन करणे हे निश्चितपणे मनावर एक निरोगी व्यायाम आहे असा संदेश विद्यार्थ्यांना  मिळाला व यामुळेच डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने पुस्तके वाचण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमासाठी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानिवडेकर, प्राचार्य पी.आर.पाटील, उप प्राचार्य एन. बी. भोळे, पी.बी. पाटील, विभाग प्रमुख एस.पी.चव्हाण व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष मेकॅनिकलच्या विद्यार्थिनींनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post