सांगलीच्या आटपाडीतील बोंबेवाडी येथे चोरट्यांनी चक्क एका डाळिंब बागेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना घडली

 आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये डाळिंब चोरीची फिर्याद दाखल झाली आहे .


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगलीच्या  आटपाडीतील बोंबेवाडी येथे चोरट्यांनी चक्क एका डाळिंब बागेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चार लाख किमतीचे तब्बल तीन टन डाळिंब रातो-रात चोरून नेले आहेत.याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये डाळिंब चोरीची फिर्याद दाखल झाली आहे.

सांगली आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या ठिकाणी यशवंत मेटकरी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. विक्रीसाठी आलेले डाळिंब रातोरात चोरून नेले आहेत.सुमारे पाचशे झाडांवरील डाळिंब  चोरट्यांनी तोडून लंपास केले आहेत. तब्बल तीन टन आणि चार लाख किमतीचे डाळिंब असल्याचं यशवंत मेटकरी यांनी सांगितला असून काही दिवसांपूर्वीच या डाळिंबाची विक्रीचा सौदा झाला होता, 148 रुपये इतका दर देखील मिटकरी यांना एका व्यापाऱ्याने फायनल केला होता.शिवाय काही दिवसातच या डाळिंबाची तोडणी होणार होती. मात्र, त्याआधीच अद्याप चोरट्यांनी मिटकरी यांच्या डाळिंब बागेवर डल्ला मारून हे डाळिंबाची चोरी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये शेतकरी यशवंत मेटकरी यांनी फिर्याद दाखल केली, असून या डाळिंब चोरीच्या घटनेमुळे आटपाडी तालुक्यातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post