महाडचे जवान राहुल भगत शहीद



प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील 

मातृभूमीच्या रक्षणासाठी जम्मू-कश्मीरच्या दुर्गम भागातील सीमेवर पाकिस्तानी सैनिकांशी लढताना रायगड जिह्यातील महाड तालुक्यांतील ईसाने कांबळे गावातील जवान राहुल आनंद भगत शहीद झाले.

त्यांचे वय 28 वर्षे होते. शहीद राहुल भगत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आईवडील असा परिवार असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.

शहीद राहुल भगत यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजे ईसाने कांबळे येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post