प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रंगदीप क्रिएशन तर्फे व्ही.के. हायस्कुल प्रांगणात भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन दि. २६ ऑक्टोबर २०२२ ते दि.६ नोव्हेंम्बर २०२२ पर्यंत करण्यात आले आहे. या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी करून कलाकारांचे कौतुक केले.
४५ वर्षाची परंपरा जपत पनवेलच्या कलाकारांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत. कलाकारांना प्रोत्साहन म्हणून आपणही आवर्जून या रांगोळी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी.असे आवाहन प्रितम म्हात्रे यानी केले आहे. या उदघाटन प्रसंगी सहकारी मंगेश भोईर, रोहित मोरे आणि इतर सहकारी उपस्थित होते.
Tags
रायगड जिल्हा