पुणे येथे अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला

ओळखीतल्या व्यक्तीनेच हे संतापजनक कृत्य केलं असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे येथे क्रूरपणाचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे संतापजनक कृत्य केलं असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात एक मजुरी करणारे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्या दाम्पत्याला 13 महिन्यांची चिमुकली आहे. या चिमुकलीच्या वडिलांच्या मित्रानेच हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.

चिमुकलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तुम्ही येईपर्यंत मी चिमुकलीचा सांभाळ करतो. तुम्ही बिनधास्त जा, असे म्हणत चिमुकलीला आपल्या कडेवर घेतले. मित्र असल्याने ते आपल्या बाळाचा सांभाळ करतील असे चिमुकलीच्या आई-वडिलांना वाटले. त्यामुळे ते दोघेही कामासाठी निघून गेले.

मित्र असल्याकारणाने चिमुकलीची काळजी घेतली जाईल असा विश्वास वाटल्यामुळे ते दाम्पत्य बाहेर निघून गेले. परंतु याचाच फायदा या नराधमाने घेऊन या लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यावर आपलं बाळ रडत असल्याकारणाने आई-वडिलांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

दरम्यान, याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीवर कलम 376 अन्वये आणि पोक्सोॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post