रवी राणा विरुद्ध आज चंदननगर पुणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी.




प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

बच्चूभाऊ कडू यांच्या विरुद्ध बेताल पणे खोटी विधाने करणाऱ्या रवी राणा विरुद्ध आज चंदननगर पुणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची तक्रार ऍड अनंत पांडुरंग काळे पुणे जिल्हा अध्यक्ष, संदीप देविदास नवले (सरचिटणीस प्रहार जनशक्ती पक्ष पुणे शहर)ऍड अनंत पांडुरंग काळे पुणे जिल्हा अध्यक्ष, आनंद जगताप,पुणे शहर कामगार आघाडी अध्यक्ष, प्रवीण खरात वडगावशेरी मतदार संघ अध्यक्ष, चंद्रकांत सावंत,कामगार आघाडी वडगावशेरी अध्यक्ष,महादेव भोसले कार्याध्यक्ष वडगावशेरी,सागर ननावरे रुग्णसेवक,हरीश औताडे रुग्णसेवक,अशोक कायंदे सोसिल मेडिया वडगावशेरी अध्यक्ष यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना प्रत्येकी 50 कोटी दिल्याची विधाने रवी राणा यांनी मीडिया समोर केली.या विधानांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची देखील रवी राणा यांनी बदनामी केली आहे, या विधानाने आज आमची सुद्धा व सर्व पदाधिकारी यांची बदनामी करणाऱ्या रवी राणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून तक्रार दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post