आपच्या टीके नंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर कर्वे पुतळा परिसरात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कर्वे पुतळ्या शेजारी पुतळ्या पेक्षाही भला मोठा, उंच फ्लेक्स उभारला गेला होता. काल यावर आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी सडकून टीका केली होती.
फ्लेक्सबाजी सोडून पुणेकरांसाठी विशेष काहीही न केलेले भाजपचे नेते पुणेकरांनी सहन केल्याने, त्यांना वेळीच प्रतिकार न केल्याने आता सवंग प्रसिध्दीच्या नादात त्यांची मजल महापुरुषांच्या अवहेलना, अपमानापर्यंत गेली. हे अत्यंत निषेधार्ह आहे.
महर्षी कर्वेंच्या पुतळ्या शेजारील चंद्रकांत पाटील यांचा पुतळ्या पेक्षाही भला मोठा, उंच फ्लेक्स आम आदमी पक्षाच्या टीकेनंतर भाजपने रातोरात हटवला.
काल कर्वे पुतळा येथे आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त केला होता. यामध्ये आपचे डॉ अभिजीत मोरे, प्रा सुहास पवार, सुशील बोबडे, निलेश वांजळे, प्रा बाबासाहेब जाधव, किशोर मुजुमदार, सुरेखा भोसले, विद्यानंद नायक, किरण कांबळे, फेबियन समसन, शेखर ढगे, रवी लाटे, आबासाहेब कांबळे, सीमा गुट्टे, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, ऋषिकेश मारणे, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, साहिल जवळेकर, यादव, संतोष सांबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.