प्रेस मीडिया लाईव्ह :
भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे.पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खडसे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप नेत्यांच्या रडारवर आहेत. दरम्यान 2016 सालीचे भोसरी भूखंड प्रकरण घोटाळा पुन्हा एकदा न्यायालयात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार आहे. भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी 31 जानेवारी 2023 पर्यंत तपास पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच 31 जानेवारी 2023 पर्यंत एकनाथ खडसेंना अटक न करण्याच्याही सूचना न्यायालयाच्या दिल्या आहेत. तसेच या आधीच्या काही मुद्याचा तपास का झाला नाही याचीही चौकशी होणार आहे.